श्री देव धूतपापेश्वराची आरती

शिवसांब शिवसांब शिव धूतपापा ।

त्वत्सेवक दासाच्या हरिसी भवतापा ।। शिवसांब || धृ ||

त्वन्मूर्ति ध्यानीय बहु प्रेमळ आवडते ।

पहाता चंद्र ललाटी मन तल्लीन होते ।

पिंगट जटात गंगाजळ शिरी डळमळते ।

निर्मल पाणी शीतळ सर्वांगी स्त्रवते ।। शिवसांब || धृ ||

परिधान व्याघ्रावर रुंडाच्या माळा ।

भासे शुद्ध मयुरा परि कंठाही काळा ।

तृतीय नेत्री निघती दीप्ताग्नि ज्वाळा ।

अंगावर धुंद करे नागाचा मेळा || शिवसांब || धृ।।

जगदीशा दे मज पादांबुज सेवा ।

आसक्त भ्रमरापरि होऊन रस घ्यावा ।

मायाही जग अवघे उपदेश व्हावा ।

विष्णूने ज्ञानाचा सुदीप लावावा ।। शिवसांब ।। धृ ।।